Team Agrowon
सिंहगड हा किल्ला पुण्यातील एक प्रसिद्ध किल्ला आहे. अनेक प्रेक्षर आवर्जुन या ठिकाणी भेट देत असतात.
सुट्टीच्या दिवसाव्यतिरिक्त देखील येथे पर्यटकांची गर्दी पहायला मिळते. अशातच आता याच पर्यटकांसाठी एक समाधानकारक गोष्ट सुरु करण्यात आली आले.
आलेल्या पर्यटकांना पाहण्यासाठी तिकीट आकारलं जातं. गडावर जाण्यासाठी वणविभागाचे शुल्क आकारतं. हे शुल्क वनविभागाकडून रोख पद्धतीने आकारलं जात होतं.
सध्याच्या या डिजिटल युगामुळे अनेकजण ऑनलाइन पेमेंट करण्याला प्राधान्य देता. मात्र सिंहगडावर उपलब्ध नसल्याने पर्यटकांची गोची व्हायची.
गडावर येणारे पर्यटक हे आता रोखीने किंवा डिजिटल व्यवहारांद्वारे तिकीट काढू शकणार आहेत. वनविभागाने काही बँकासोबत करार करून खाते देखील काढली आहेत.
या नव्या प्रणालीनुसार आता डिजिटल पद्धतीन तिकीट काढता येणार आहे. यासाठी पर्यटक ऑनलाइन पेमेंट अ ॅपचा वापर करू शकतील.
सध्या दुचाकींसाठी ५० रुपये आणि चारचाकीसाठी १०० रुपये पार्किंग शुल्क आकारले जाते. सोमवारपासून पर्यटकांना डिजिटल पेमेंट करता येणार आहे.