Team Agrowon
डॉ. विष्णु गरांडे, डॉ. प्रदीप दळवे, सुनील नाळे
सीताफळाचा गर नियमित सेवन केल्याने अशक्तपणा दूर होतो. पिकलेल्या फळाच्या सालीचा तसेच बियांचा उपयोग शरीरावरील जखमा बऱ्या करण्यासाठी होतो.
मुळयांचा काढा कर्करोगावर गुणकारी आहे.
फळाचा गर शुक्राणूवर्धक, तृष्णावर्धक, बलवर्धक, उत्साहवर्धक, पचनशक्ती वाढविणारा व पित्तविकार कमी करणारा आहे. फळे हाडांच्या व दातांच्या मजबुतीसाठी उपयोगी असतात.
हृदयाची कार्यक्षमता वाढवतो तसेच रोगप्रतिकार शक्ती वाढवणारा आहे.
गर काढून साठविता येतो. गराची पावडर, टॉफी, जॅम, पेये, नेक्टर, सिरप, मिल्कशेक, रबडी, आइस्क्रीम, श्रीखंड तयार करता येते. गराचा वापर विविध मिठाई, बेकरी व कन्फेक्शनरीमध्ये केला जातो.
रबडी तयार करण्यासाठी प्रथम नेहमीप्रमाणे दुधाची बासुंदी तयार करून घ्यावी. बासुंदी तयार होत असताना शेवटी गर मिसळून एकजीव करून घ्यावा.
गर आपणास विविध पदार्थ तयार करण्यासाठी वर्षभर केव्हाही वापरता येतो. गोठविलेल्या गरास स्थानिक तसेच परदेशी बाजारपेठात चांगली मागणी असते.
गर किंवा पावडर वापरून उत्तम प्रतीचे श्रीखंड तयार करता येते. श्रीखंडास चांगला स्वाद व चव असते.
पावडर आपणास आइस्क्रीम, कन्फेक्शनरी, श्रीखंड, मिल्कशेक, टॉफी इत्यादी पदार्थ तयार करताना वापरता येते.