Swapnil Shinde
भोर तालुक्यातील हिरडस मावळातील नीरा नदीवर असलेले नीरा देवघर धरण आज सकाळी भरले आहे.
गेल्या काही दिवसाच्या विश्रांतीनंतर गेले चारपाच दिवसांपासून पावसाने धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली.
निरा नदीपात्रात धरणाच्या सांडव्याद्वारे 1744 क्यूसेक व विद्युतगृहाद्वारे 750 क्यूसेक असे एकूण 2494 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
धरणातून नदीपात्रामध्ये रविवारी सकाळी 7 वाजता एकूण 4230 क्यूसेक विसर्ग नदीपात्रामध्ये सुरू करण्यात आला.
भाटघर व नीरा देवघर धरणाच्या पाण्यावर ३ जिल्ह्यांत आणि ९ तालुक्यांतील सुमारे २ लाख ५० हजार क्षेत्र ओलिताखाली येते.
धरण भरल्यामुळे पूर्वेकडील भागातील लोकांची पिण्याच्या पाण्याची आणि शेतीच्या पाण्याची चिंता मिटली आहे.
धरणातून नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला असुन नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता.
धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण कमी झाला आहे.