Crop Insurance : पावणेदोन लाख शेतकऱ्यांना मिळाली पिकविमा भरपाई

Team Agrowon

हवामानाच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे खरीप पिकांचे नुकसान झाल्यानंतर अधिसूचना जारी झालेल्या तालुक्यांची संख्या १९१ पर्यंत गेली आहे.

Crop Damage | Agrowon

या मंडलांमध्ये भरपाई देण्याची तरतूद विमा योजनेच्या करारात आहे. त्यानुसार आतापर्यंत तीन जिल्ह्यांतील पावणेदोन लाख पात्र शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात आली आहे.

पंतप्रधान पीक विमा योजनेत सहभागी झालेल्या अधिसूचित नुकसानग्रस्त महसूल मंडलांचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा घेण्यात आला आहे.

Crop Damage | Agrowon

नुकसानीची तीव्रता पाहून जिल्हाधिकारी अधिसूचना जारी करतात. त्यानंतर पंचनामा होऊन पात्र शेतकऱ्यांना भरपाई दिली जाते.

Crop Damage | Agrowon

मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थितीमुळे नुकसान होऊन अधिसूचना जारी झालेले एकूण जिल्हे १५ आहेत. त्यातील गोंदिया, कोल्हापूर व जालना जिल्ह्यातील १,४१,४५० शेतकऱ्यांना भरपाई देण्यात आली आहे.

Crop Damage | Agrowon

भरपाईपोटी ‘एचडीएफसी इर्गो’ विमा कंपनीने ४४.९७ कोटी शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा केले आहेत. उर्वरित १२ जिल्ह्यांमध्ये भरपाई निश्चित करण्याचे काम वेगाने सुरू आहे.

Crop Damage | Agrowon

‘एचडीएफसी’च्या क्षेत्रातील २७ तालुक्यांमधील ९१ महसूल मंडलांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी अधिसूचना काढली. त्यापैकी ५५ मंडलांना भरपाई देण्यासाठी कंपनीने पात्र ठरविले होते.

Crop Damage | Agrowon

दरम्यान, कृषी आयुक्तालयाच्या म्हणण्यानुसार, पंतप्रधान पीक विमा योजनेतील तरतुदीनुसार अधिसूचित मंडलांतील विमाधारक शेतकऱ्याला कितीही वेळा नुकसानीबाबत पूर्वसूचना देता येते.

Crop Damage | Agrowon
cta image