Anuradha Vipat
आपल्या हिंदू धर्मामध्ये नवरात्रीच्या दिवसात केल्या जाणाऱ्या कन्या पूजनाला विशेष महत्त्व आहे. नवरात्रीमध्ये अष्टमी आणि नवमीला कन्या पूजन केले जाते.
कन्या पूजनाच्या दिवशी लहान मुलींना भेटवस्तू, भोजन देऊन त्यांची श्रद्धेने पूजा केली जाते.
लहान मुलींच्या केसांमध्ये रंगीबेरंगी हेअर एक्सेसरीज खूप सुंदर दिसतात.
लहान मुलींना कपड्यांपेक्षा दागिने जास्त आवडतात. मुलींना नटायला लहानपणापासूनच आवडतं.
नवरात्रीमध्ये कन्या पूजनाच्या दिवशी मुलींना बांगड्या भेट देण्याचे विशेष महत्त्व आहे.
नवरात्रीमध्ये मुलींना फळे दिल्याने तुम्हाला तुमच्या चांगल्या कर्माचे फळ अनेक पटीने परत मिळते.
कन्या पूजनानंतर मुलीला फळे, पुस्तके आणि खेळणी देणे खूप शुभ मानले जाते.