Team Agrowon
सातारा जिल्ह्यात सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या बांबू लागवड अभियानाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.
स्थानिक शेतकऱ्यांच्या साथीने बांबूची रोपे लावून या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या.
एकनाथ शिंदे म्हणाले, बांबूपासून वेगवेगळे साहित्य, फर्निचर, इथेनॉल, अलंकार वस्तू बनवू शकतो, या सर्वांच्या निर्मितीतून बांबूपासून उत्पादनाचे एक चांगले मॉडेल तयार होईल.
बांबूसाठी हेक्टरी 6 लाख 90 हजारापर्यंतची रक्कम शासन शेतक-यांना टप्याटप्याने देते. चौथ्या वर्षी उत्पादन सुरु झाल्यावर एकरी एक लाखापर्यंत त्याला उत्पन्न मिळू शकते.
बांबूचे उत्पादन घेणे शेतकऱ्यांसाठी किफायतशीर असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले
आता केंद्र सरकारच्या धोरणामुळे तर विमानतळ किंवा इमारतींचा सुशोभीकरणासाठी देखील बांबूचा वापर केला जातो.
बांबूचे रोप हे बहुगुणी आणि अनेक गोष्टींसाठी वापरले जाते. त्यामुळे शेतकऱ्यांनी बांबू पिकाची जास्तीत जास्त प्रमाणात लागवड करावी, असे आवाहन केले