Anuradha Vipat
मेहंदीचा रंग गडद आणि दीर्घकाळ टिकण्यासाठी मेहंदी काढल्यानंतर त्वचेची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.
अनेक मुली नकळत काही चुका करतात ज्यामुळे मेहंदीचा रंग फिकट होतो.
मेहंदी काढल्यानंतर 'या' चुका कटाक्षाने टाळा आणि रंग गडद करण्यासाठी आम्ही दिलेल्या या टिप्स वापरा.
मेहंदी सुकल्यानंतर लगेच हात पाण्याने धुणे किंवा साबण लावणे टाळा.
मेहंदीची पेस्ट लवकर सुकावी म्हणून हेअर ड्रायरने गरम हवा देणे टाळा.
मेहंदी सुकल्यावर लगेच खरडून काढणे किंवा खूप घासून काढणे टाळा.
काहीजणी रंग गडद करण्यासाठी लिंबू-साखरेचे मिश्रण वारंवार आणि जास्त प्रमाणात लावतात.