Anuradha Vipat
बद्धकोष्ठतेचा त्रास चुकीची जीवनशैली, फायबरचा अभाव आणि कमी पाणी पिण्यामुळे होतो.
बद्धकोष्ठता या समस्येपासून नैसर्गिक आणि कायमची सुटका मिळवण्यासाठी खालील सर्वोत्तम घरगुती उपाय अत्यंत प्रभावी ठरतात.
रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास कोमट दुधात १ किंवा २ चमचे शुद्ध गाईचे तूप मिसळून प्या. यामुळे आतड्यांमधील कोरडेपणा दूर होऊन सकाळी पोट साफ होण्यास मदत होते.
रात्री ४-५ मनुके आणि २ सुके अंजीर पाण्यात भिजत ठेवा. सकाळी रिकाम्या पोटी हे अंजीर आणि मनुके चावून खा आणि त्याचे पाणीही प्या.
रात्री जेवणानंतर अर्ध्या तासाने १-२ चमचे इसबगोल कोमट पाण्यात किंवा दुधात मिसळून प्या. हे घेताना दिवसा भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे.
रात्री झोपताना १ चमचा त्रिफळा चूर्ण कोमट पाण्यासोबत घ्या. यामुळे आतड्यांची हालचाल सुधारते आणि पोट पूर्णपणे साफ होते.
सकाळी उठल्याबरोबर न चुकता १ ते २ ग्लास कोमट पाणी प्या. शक्य असल्यास रात्री तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी सकाळी पिण्याने पोटाच्या सर्व समस्या दूर होतात.