Team Agrowon
महाराष्ट्र जलसंधारण महामंडळाच्या लाचखोर प्रकरणात आता थेट व्यवस्थापकीय संचालक सुनील कुशिरे यांचे नाव आले आहे.
जलसंधारण घोटाळ्याबाबत उच्च न्यायालयाने एक याचिका दाखल करून घेतली.
त्यामुळे दोन्ही घडामोडींमुळे जलसंधारण व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
प्रत्यक्ष महामंडळाशी कृषी खात्याचा संबंध नसला, तरी सध्या कुशिरे प्रकरणाची जोरदार चर्चा कृषी अधिकाऱ्यांमध्ये चालू आहे.
महामंडळाचे मुख्यालय औरंगाबादला असून कुशिरे मात्र पुण्यातून सूत्रे हलवित असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
राज्यातील ठेकेदारांना जलसंधारण महामंडळाकडून ६ हजार १९१ कोटींची कंत्राटे वाटली जाणार होती. ही कामे राज्यपालांनी ८ जुलै २०२२ मध्ये स्थगित केली होती.
राज्यपालांची स्थगिती असतानाही कुशिरे व त्याला मदत करणाऱ्या मंत्रालयातील लॉबीने मुख्यमंत्र्यांकडे चुकीचा पत्रव्यवहार केला.
शेतकऱ्यांच्या नावाखाली जलसंधारण व मृद्संधारणात दरवर्षी अब्जावधी रुपये वाया गेले आहेत.