Anuradha Vipat
नखांवर दिसणारी काही लक्षणे कधीकधी कॅन्सरची लक्षणे असू शकतात. ही लक्षणे वेळीच ओळखून डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.
आज आपण नखांवर दिसू शकणारी संभाव्य कॅन्सरची लक्षणे पाहणार आहोत.
नखांखाली तपकिरी, काळी किंवा निळसर रंगाची उभी रेषा किंवा डाग दिसणे.
संपूर्ण नख किंवा नखाचा काही भाग अचानक आणि स्पष्टपणे रंग बदलणे.
नखे अचानक जाड होणे, वेडीवाकडी वाढणे, नखांवर उंचवटे तयार होणे किंवा नखे ठिसूळ होऊन सहज तुटणे.
नखांखालील त्वचा सुजणे, दुखणे, रक्तस्त्राव होणे किंवा नख त्वचेपासून वेगळे होणे
नखांच्या मुळाशी किंवा बाजूची त्वचा काळी किंवा गडद रंगाची होणे.