Team Agrowon
नागपूर संत्र्यांचा हंगाम साधारण नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू झाला. यावर्षी अवकाळी पावसामुळे माशीसह बुरशीची लागण झाल्याने ३० टक्के नुकसान झाल्याचा शेतकऱ्यांनी अंदाज वर्तविला आहे.
लाकडाच्या पेटीमधील संत्र्यांची विक्री डझननुसार तर क्रेटमधील संत्र्यांची विक्री वजनावर होते.
यावर्षी अवकाळी पावसाचा फटका बसल्याने हंगामातील पहिल्या टप्प्यात चांगल्या दर्जाच्या संत्र्यांची आवक कमी राहिली.
हा हंगाम आणखी १५ दिवस सुरू राहील आणि यानंतर राजस्थान आणि मध्यप्रदेशातून आवक सुरू होऊन, हा हंगाम पुढे दीड महिना राहील.
जस्थान, मध्यप्रदेशच्या संत्र्यांची चव गोडीला कमी आणि तुलनेने आंबट असते. तर दर साधारण ५० ते ७० रुपये प्रति किलो राहील.’’
हंगामाच्या मध्यावर चांगली आवक झाली. नागपूर येथून संत्र्यांची लाकडाच्या पेटीसह, क्रेटमध्ये आवक होती.