Team Agrowon
आज नागपंचमी सगळीकडे अगदी उत्साहाने साजरी केली जाते. आज नाग आणि सापाची पूजा सगळीकडे केली जाते
पूर्वापार चालत आलेल्या परंपरेपासून या दिवशी नागाला आणि लाह्या, दूधाचा नैवद्य दाखवला जातो. काही ठिकाणी तर पूजेसाठी खऱ्याखुऱ्या नाग-साप पकडून आणले जातात.
या नागाला, सापाला दुधाचा अभिषेक घातला जातो. आणि त्याला दूध आवडत असल्याने दूध देखील पाजलं जातं.
पण खरचं नाग किंवा साप दूध पितात का त्यांना दूध खरचं आवडतं का? यावरं पशुतज्ञ काय सांगतात
साप दूध पीत नाही असा दावा विज्ञानात करण्यात आला आहे. साप हा मांसाहारी प्राणी आहे. तो त्याच्या आहारात बेडूक, उंदीर आणि इतर प्राणी खातो.
सापाचे दूध पिण्याचा दावा ते सर्पमित्र करतात ते सापांना बराच काळ कैदेत ठेवतात. सापाला भुकेने व तहानलेल्या स्थितीत ठेवले जाते. त्यामुळे काहीही न मिळाल्याने साप दूध पितात.
दूध सापाला पचत नाही. दुध सापाच्या फुफ्फुसात जाते आणि त्यामुळे न्यूमोनियासारख्या समस्या निर्माण होतात. यामुळे त्याचा मृत्यूही होऊ शकतो.