Team Agrowon
जागतिक व्यापार संघटनेच्या निकषांनुसार ही बाब सुसंगत नसून साहजिकच भारतासह अन्य विकसनशील देशांच्या युरोपातील शेतीमाल निर्यातीवर (Export) त्याचा परिणाम झाला आहे.
साहजिकच या सर्व देशांनी या विषयावर एकत्र येऊन लढण्याची गरज आहे, जेणे करून युरोपकडून या निर्णयाचा पुनर्विचार होऊ शकेल, असे मत तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.
विकसनशील देशांकडून शेतीमालाची निर्यात सुकर होण्याच्या दृष्टीने पथदर्शक प्रयत्न सुरू झाले आहेत.
भारतासह जगातील अनेक विकसनशील देशांकडून युरोपला विविध शेतीमालाची निर्यात होते.
प्रति १०० टन मालामागे ही पातळी एक ग्रॅम एवढी सूक्ष्म पातळीवर होते.
साहजिकच भारतासह अन्य विकसनशील देशांतून युरोपला होणाऱ्या शेतीमाल निर्यातीवर त्याचा परिणाम होऊ शकतो.