Team Agrowon
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा या आपल्या बेधडक स्वभावासाठी प्रसिध्द आहेत. याच नवनीत राणांचा शेतातील डॅशींग अंदाज पाहायला मिळाला आहे.
आपल्या विरोधकांना थेट भिडण्याची ताकद ठेवण्याऱ्या खासदार अशी नवनीत राणा यांची ओळख आहे.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या विरोधातील हनुमान चालीसा आंदोलनानंतर नवनीत राणा यांची जोरदार चर्चा झाली होती.
अमरावती लोकसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडून आलेल्या खासदार नवनीत राणा भाजपसाठी काम करतात, असा आरोप त्यांच्या विरोधकांकडून केला जातो.
सध्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची खरीप हंगामाची लगबग सुरू आहे. अशातच नवनीत राणा यांनी थेट शेतात जात ट्रॅक्टर चालविला आहे.
खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघातील शेतीच्या कामांचा नवनीत राणा यांनी आढावा घेतला.
मोर्शी तालुक्यातील शेतकरी किरण काकडे यांच्या शेतात ट्रॅक्टर चालविला आहे. यावेळी त्यांनी यंदा चांगला पाऊस पडून शेतकरी सखी, ,समाधानी व्हावी अशी प्रार्थना निसर्गदेवतेला केली.
यावेळी नवनीत राणा यांनी शेतकऱ्यांच्या अडीअडचणी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.