Gulmohar Flower : गुलमोहराच्या फांद्यात दडलेला चंद्र

Team Agrowon

खेळून थकलो की त्याच गुलमोहराच्या बुंध्याला टेकून बसायचं..बसल्या-बसल्या खाली पडलेल्या पाकळ्या गोळा करायच्या.

Gulmohar Flower | A B Mane

गुलमोहराच्या काही फुलांच्या सगळ्या पाकळ्या लाल नसायच्या. एकच पाकळी वेगळी असायची...

Gulmohar Flower | A B Mane

पांढर्‍यावर गुलाबी-लाल ठिपक्यांनी सजलेली. सगळ्या पाकळ्यांमध्ये उठून दिसायची ती. घराच्या जवळ एक गुलमोहर दरवर्षी भरभरून फुलायचा अगदी दुरूनच त्याचं दर्शन मन प्रसन्न करून जातं असे.

Gulmohar Flower | A B Mane

फुलांनी बहरलेल्या डहाळ्या सतत वाऱ्यावर हेलकावे घेत सर्वांना सतत सांगत असतात की, आयुष्यातल्या संकटांना न घाबरता, न खचता नेहमी माझ्या सारखं फुलत राहा.

Gulmohar Flower | A B Mane

ऐन भरात असताना झाडाखाली पडणारा फुलांचा सडा डोळे दिपवून टाकायचे शाळेत असताना आम्ही गुलमोहराच्या पाकळ्या चावून खायचो. तुरट किंचित गोडसर चव असते त्याची.

Gulmohar Flower | A B Mane

देठापासून तोडून मागील बाजूने चोखल्यास इवलासा गोडसर रस लागायचा. ही गंमत मला वाटतं आजकालच्या पिढीला दुर्मिळच. खूप छोट्या छोट्या गोष्टींमध्ये खूप मोठा आनंद शोधायचा होता तो काळ.

Gulmohar Flower | A B Mane
Ginger | Agrowon