Team Agrowon
राज्यात काही ठिकाणी पावसाचा (Rain) जोर वाढला होता. मात्र मराठवाडा (Marathwada) आणि विदर्भातील अनेक ठिकाणी पावसानं उघडीप दिली.
तर हवामान विभागानं (IMD) उद्या सकाळपर्यंत कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही मंडळांत विजांसह (Rain With Thunder) जोरदार पावसाचा अंदाज जारी केलाय.
कोकणातील अनेकभागांमध्ये आज पावसाने हजेरी लावली. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड आणि पालघर जिल्ह्यात पावसानं हजेरी लावली.
काही मंडळांमध्ये जोरदार पाऊस झाला. मात्र बहुतेक ठिकाणी पावसाचा जोर कमी होता.
रायगड जिल्ह्यातील काही मंडळांमध्ये काही काळ जोरदार पावसाने हजेरी लावली. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातही तुरळक ठिकाणी मध्यम स्वरुपाच्या सरी झाल्या.
मध्य महाराष्ट्रातही पावसाची अनेक भागांमध्ये रिपरिप झाली. तर काही ठिकाणी जोरदार सरी पडल्या. कोल्हापूर, पुणे आणि सातारा जिल्ह्यातील काही मंडळांमध्ये पावसाचा जोर अधिक होता.
तर सोलापूर जिल्ह्यातही ठिकठिकाणी पावसाचा शिडकावा झाला. नगर आणि नाशिक जिल्ह्यातही काही मंडळांमध्ये चांगला पाऊस झाला. तर बहुतेक ठिकाणी हलक्या सरी पडल्या.