Anuradha Vipat
पावसाळ्यात हवेतील दमटपणामुळे जीवाणू आणि विषाणूंचा प्रसार वेगाने होतो, ज्याचा थेट परिणाम लहान मुलांच्या आरोग्यावर होतो.
मुलांची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवण्यासाठी पावसाळ्यात त्यांच्या आहारात खालील मान्सून स्पेशल फूड्स नक्की समाविष्ट करा.
मुलांसाठी टोमॅटो, मिक्स व्हेजिटेबल किंवा चिकन सूप अत्यंत फायदेशीर आहे.
हळदीमध्ये 'कर्क्युमिन' असते, जे उत्तम अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-व्हायरल आहे .
पावसाळ्यात मिळणारी ही हंगामी फळे जीवनसत्त्वे आणि फायबरने समृद्ध असतात. हे खाल्ल्याने मुलांची पचनशक्ती चांगली राहते.
पावसाळ्यात मुलांना रोज एक सुकामेवा लाडू दिल्याने शरीराला ऊर्जा मिळते आणि प्रतिकारशक्ती वाढते
१ चमचा मधामध्ये २ थेंब तुळशीचा आणि आल्याचा रस मिक्स करून मुलांना दिल्यास छातीतील कफ दूर होतो .