Anuradha Vipat
पावसाळ्यात डेनिम किंवा जीन्स परिधान केल्याने अस्वस्थता, त्वचेच्या समस्या आणि ओलसरपणा वाढू शकतो.
डेनिम किंवा जीन्स हा अनेकांच्या आवडीचा पोशाख असला तरी पावसाळ्यात त्याचा वापर शक्यतो टाळावा.
डेनिम हे जाड सूती कापड असल्यामुळे ते पावसाचे पाणी सहज शोषून घेते. एकदा जीन्स भिजली की ती बराच वेळ ओलीच राहते.
डेनिमचे फॅब्रिक जाड असल्याने ते इतर कपड्यांच्या तुलनेत उशिरा सुकते.
ओले कपडे दीर्घकाळ परिधान केल्यास त्वचेवर खाज, पुरळ किंवा बुरशीजन्य संसर्गाचा धोका वाढू शकतो.
भिजल्यानंतर जीन्सचे वजन वाढते. त्यामुळे चालणे, प्रवास करणे किंवा जिने चढणे अधिक अवघड वाटू शकते.
ओल्या डेनिममध्ये ओलावा टिकून राहिल्यास जीवाणूंची वाढ होऊन अप्रिय वास येण्याची शक्यता असते.