Swapnil Shinde
टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी क्रिकेटच्या मैदानावर दमदार कामगिरी करीत आहे.
जसा तो मैदानात असतो. तशीच त्याची क्रिकेटच्या मैदानाबाहेर लँजरी लाईफ आहे.
शमी सुट्टीच्या दिवसात कुटुंबासोबत एन्जॉय करत असतो. सोशल मीडियावर काही फोटो शेअर करतो.
उत्तरप्रदेशमधील अमरोहा जिल्ह्यातील अलिनगरमध्ये शमीचे १५० एकरामध्ये फॉर्म हाऊस आहे.
त्याने काही दिवसांपूर्वी शेतात सायकलीवर बसून ऊस खाण्याची मजा लुटत असल्याचा फोटो व्हायरल झाला होता.
तसेच उन्हाळ्यात आंब्यात बागातील एक फोटो शेअर केला होता. आंब्याच्या बागेत मध्यभागी उभा राहून हातात आंबा घेऊन पोज देताना दिसला.
शमी गावी जाऊन निसर्गाचा आनंद लुटताना दिसत असतो. त्या या देशी अंदाजावर सोशल मीडिया यूजर्स सतत कमेंट्स देत आहेत.