Anuradha Vipat
साडीमध्ये मॉडर्न आणि ग्लॅमरस दिसायचे असेल तर योग्य ॲक्सेसरीजची निवड महत्त्वाची ठरते.
ट्रेन्ड्सनुसार साडीवर मॉडर्न लूक मिळवण्यासाठी तुम्ही खालील गोष्टी ट्राय करू शकता.
साडीवर बेल्ट लावणे हा सध्याचा सर्वात लोकप्रिय मॉडर्न ट्रेंड आहे. यामुळे साडीला वेस्टर्न टच मिळतो.
साडीवर लांब जॅकेट, क्रॉप जॅकेट किंवा अगदी ऑफिसवेअर ब्लेझर परिधान करा. हा लूक तुम्हाला एक 'पॉवर लूक' देतो.
जर तुमची साडी साधी असेल तर त्यावर जड 'स्टेटमेंट नेकलेस' किंवा 'चोकर' वापरा.
साडीवर मॉडर्न 'क्लच' किंवा छोटी 'स्लिंग बॅग' वापरा.
तुम्हाला इंडो-वेस्टर्न लूक हवा असेल तर तुम्ही साडीवर 'स्नीकर्स' किंवा 'बूट्स' ट्राय करू शकता.