Team Agrowon
हापूसपेक्षाही महाग असणारा आंबा आता भारतात पिकवला जात आहे. हा आंबा प्रामुख्याने जपान या देशात पिकवला जातो.
मियझाकी असे या आंब्याच्या जातीचे नाव असून जगातील सर्वात महागडा आंबा अशी याची ख्याती आहे.
जपानमध्ये पिकवला जाणारा हाच आंबा आता भारतातील पश्चिम बंगाल या राज्यात पिकवला जात आहे.
जगातील सर्वात महाग असणाऱ्या आंब्याची किंमत प्रतिकिलो तीन लाख रुपये असल्याचे सांगितले जाते.
या आंब्याच रंग नेहमीच्या पिवळ्या, केशरी रंगापेक्षा वेगळा असतो. मियाझाकी आंब्याचा रंग वांगी किंवा जांभळ्या प्रकाराचा असतो.
मियाझाकी जातीच्या आंब्याचे वजन जवळपास ३५० ग्रॅमपासून ९०० ग्रॅमपर्यंत असते. या आंब्यामध्ये असणाऱ्या औषधी गुणधर्मांमुळे याची किंमत महाग असल्याचे सांगितले जाते.
सर्वसाधारण आंब्याच्या तुलनेत मियाझाकी आंब्यामध्ये १५ टक्क्यांहून अधिक साखरेचे प्रमाण असते.
यामध्ये बीटो कॅरोटीन आणि फोलिक अॅसिडचे प्रमाण जास्त असते. डोळ्यांची दृष्टी कमी असणाऱ्यांसाठी हा आंबा फायदेशीर असल्याचे मानले जाते.