Team Agrowon
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेंतर्गत केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना वार्षिक ६ हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाते.
ही रक्कम दर चार महिन्यांच्या अंतराने तीन हप्त्यांमध्ये लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाते. एकावेळी दोन हजार रुपयांचा हप्ता जमा केला जातो.
आतापर्यंत या योजनेंतर्गत १३ हप्त्यांची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे. अशातच आता योजनेचा १४ वा हप्ता कधी येणार याची शेतकरी वाट पाहत आहे.
मात्र, अर्ज भरताना काही चुकांमुळे योजनेचा हप्ता शेतकऱ्यांना मिळत नाही. अर्ज भरताना या चुका टाळल्यास शेतकऱ्यांचा हप्ता खात्यात जमा होण्यास अडचण येत नाही.
पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठीचा अर्ज भरताना कोणतीही चुक होणार नाही, याची काळजी घ्यावी.
अर्ज भरताना नाव, लिंग, आधार क्रमांक किंवा पत्त्याचा तपशील ही माहिती अचुक भरावी. ही माहिती भरताना चुक झाल्यास तुम्ही योजनेच्या हप्त्यापासून वंचित राहू शकता.
याशिवाय अर्ज भरताना खाते क्रमांक पुन्हा पुन्हा तपासून पाहा. खाते क्रमांक टाकताना चुक झाल्यास योजनेचा हप्ता मिळणार नाही.
अशावेळी पीएम किसानच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्जामध्ये झालेल्या चुकांची दुरूस्ती करू घेणे आवश्यक आहे.