Mint Health Benefits : सुगंधी, औषधी गुणधर्मांनीयुक्त पुदिना

Team Agrowon

औषधी गुणधर्म

पुदिना पानांमध्ये औषधी गुणधर्म आहेत. उत्तेजक, वायुनाशी व आकडीरोधक असून पोटदुखी, अर्धशिशी, सांधेदुखी, बद्धकोष्ठ, अतिसार, पोटातील व्रण व सर्दी अशा विकारांवर गुणकारी.

Mint Health Benefits | Agrowon

पानांपासून तेल निर्मिती

पाने स्वयंपाकात स्वादाकरिता वापरतात. पानातून बाष्पनशील मिंट तेल काढून ते सौंदर्यप्रसाधनांमध्ये वापरतात. पानांपासून मिळवलेल्या तेलात ७० टक्के मेंथॉल असते.

Mint Health Benefits | Agrowon

सुगंध देण्यासाठी मिंट तेल

चहा, सरबत, जेली, कँडी, सूप आणि आइस्क्रीम यांत पानांचा सुगंध मिसळतात. काही पेयांना सुगंध देण्यासाठी मिंट तेल वापरतात.

Mint Health Benefits | Agrowon

पुदिना तेलाचा कीटकनाशकांमध्ये वापर

गांधील माश्या, मुंग्या व झुरळे यांचा नाश करण्यासाठी पुदिन्याचे तेल कीटकनाशकांमध्ये मिसळतात.

Mint Health Benefits | Agrowon

पुदिन्याची लागवड

चिकणमाती किंवा वालुकामय, निचरा होणारी, सेंद्रिय पदार्थांनी युक्त खोल जमीन लागवडीसाठी निवडावी. काळ्या आणि लाल दोन्ही प्रकारच्या जमिनीवरही पुदिना लागवड करता येते.

Mint Health Benefits | Agrowon

लागवडीला हंगाम

पावसाळ्याचा हंगाम सुरू होण्यापूर्वी लागवड करावी. उत्तर भारतात जपानी पुदिना लागवड फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून ते मार्चच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत करतात.

Mint Health Benefits | Agrowon

सरी वरंबा पद्धतीने लागवड

पेरणीपूर्वी मुनवे १० ते १४ सें.मी. लांबीमध्ये कापून घ्यावेत. मुनव्यांची लागवड सरी वरंबा पद्धतीने करावी. ६० सेंमी अंतराच्या ओळीत ४० सेंमी अंतराने मुनव्यांची लागवड करावी.

Mint Health Benefits | Agrowon
Honeybee | Agrowon