Millets Health Benefit : भरडधान्याचा आरोग्यासाठी काय फायदे आहेत?

Team Agrowon

ज्वारी हाडे मजबुती तसेच वनज नियंत्रित ठेवण्यास उपयुक्त. रक्ताभिसरणाची क्रिया सुरळीत पार पाडण्यास मदत करते.

Millets Health Benefit | Agrowon

अँटिऑक्सिडंट्स अधिक प्रमाणात असल्याने शरीरातील फ्री रॅडिकल्स बाहेर काढत्यासाठी उपयुक्त. शरीरातील ग्लुकोजचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत करते.

Millets Health Benefit | Agrowon

बाजरीमध्ये उष्मांक जास्त असल्यामुळे थंडीमध्ये शरीरात उष्णता वाढवण्यास फायदेशीर आहे. बाजरीतील पोषक तत्त्वांमुळे शरीरातील कोलेस्ट्रॉल पातळी व रक्तदाब नियंत्रित राखला जातो. दैनंदिन आहारात बाजरी सेवन केल्यामुळे हाडांना मजबुती मिळते. हृदयाचे आरोग्य राखले जाते.

Millets Health Benefit | Agrowon

लहान मुलांसाठी शक्तिवर्धक म्हणून नाचणीला ओळखले जाते. वजन नियंत्रित ठेवण्यास फायदेशीर ठरते. लोहाचा उत्तम स्रोत असल्यामुळे गरोदर महिलांच्या पोटातील गर्भाचा विकास होण्यास मदत होते.

Millets Health Benefit | Agrowon

राळामधील लोह आणि कॅल्शिअम हाडे मजबूत राखण्यास मदत करतात. रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्यास उपयुक्त. मज्जासंस्था निरोगी ठेवण्यास मदत करते. पचनसंस्था चांगली राहते. त्यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो.

Millets Health Benefit | Agrowon

प्रथिनांचा उत्तम स्रोत म्हणून भगर ओळखली जाते. पचनास हलकी असल्याने फायदेशीर. भगरमधील नियासीन (B३) जीवनसत्त्वामुळे त्वचेचे आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते.

Millets Health Benefit | Agrowon
Jowar | Agrowon