Team Agrowon
पशुखाद्याच्या वाढत्या किमतींमुळे दूध उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत.
दुभत्या जनावरांसाठी सरकी पेंड, गोळी पेंड, मक्याचा भरडा, शेंग पेंड, गहू भुशी याबरोबरच वेगवेगळी सप्लिमेंट्स ठेवावी लागतात.
ओला व वाळलेला चारा समप्रमाणात ठेवल्यास गाईचे आरोग्य व्यवस्थित राहाते व दुधात सातत्य टिकते.
जनावरांना खाद्य देण्यासाठी गाईच्या दुधाचा दर प्रतिलिटर किमान ४८ ते ५० रुपये हवा, असे दूध उत्पादकांचे मत आहे.
दुधात दरवाढ नाही झाल्यास व पशुखाद्याच्या किमती कायम राहिल्यास या उन्हाळ्यात हा व्यवसाय अडचणीत येईल, असे जाणकार शेतकऱ्यांचे मत आहे.
एका गाईसाठी दररोज दहा किलो पशुखाद्य ठेवावे लागते.
जनावरांच्या खाद्याचे प्रतिकिलो ४० रुपयांप्रमाणे ४०० रुपये होतात. तसंच एक सुदृढ गाय सरासरी १५ लिटर दूध देते.
दूधाच्या लिटरला ३८ रुपयांप्रमाणे ५७० रुपये होतात. म्हणजे फक्त ७० रुपये एका गाईमागे दिवसाला राहतात.