Team Agrowon
दुर्गम चंद्रपूर जिल्ह्यातील अजयपूर हे दुग्धोत्पादनाचे गाव म्हणून ओळखले जाते. येथील धनराज व कमलेश या परसुटकर भावंडांनी घरचा दुग्धव्यवसाय सांभाळताना प्रक्रियेतून एक पाऊल पुढे टाकले.
दररोज विविध उत्पादनांच्या विक्रीतून १५ हजार ते १८ हजार रुपयांपर्यंत उलाढाल होते.
सणासुदीच्या काळात त्यात वाढ होते.
प्रक्रियायुक्त उत्पादने तयार करण्यासाठी अन्य शेतकऱ्यांकडून १५० लिटर दूध तर डेअरीला देण्यासाठी ६०० लिटर अशा प्रकारे दूध संकलन नियोजन केले जाते.
धनराज यांच्यासह पत्नी विद्या, वडील विठ्ठल, आई सुनंदा, बंधू कमलेश व पत्नी असे सर्वजण व्यवसायात राबतात.
सुमारे ११ लाख रुपये खर्चून बॉयलर, क्रीम सेपरेटर, दूध संकलन यंत्रणा आदी यांत्रिकीकरण केले आहे.