Team Agrowon
सहकारी दूध संघ व खासगी दुग्ध प्रकल्पाचालकांची बैठक गुरुवारी पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. यावेळी पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकासमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी मोठी घोषणा केली आहे.
दूध उत्पादकांना गायीच्या दूध खरेदी दरापोटी लिटरला किमान ३५ रुपये द्यावे लागतील. याबद्दलचा अभ्यास करून आठवडाभरात अहवाल सादर करण्यासाठी एक समिती नेमली जाईल अशी घोषणा विखे-पाटलांनी केली आहे.
शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन ठामपणे उभे असून शासनाच्या धोरणाला सहकारी व खासगी दुग्ध प्रकल्पांनी सहकार्य करावे,असे आवाहन देखील विखे यांनी केले.
दुग्धमंत्र्यांनी जाहीर केलेल्या दरापेक्षा कमी दराने खरेदी होत राहील. शासनाच्या शब्दाला महत्त्व राहण्यासाठी समिती नेमून दरवाढीबाबत धोरण ठरवावे, असे मुद्दे प्रतिनिधींनी मांडले.
या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यामुळे दुधातील भेसळ कमी होऊन शेतकऱ्यांना तसेच नागरिकांना मदत होणार आहे.
दूध भुकटीची निर्यात केवळ ‘एनडीडीबी’मार्फत होण्यासाठी केंद्राला प्रस्ताव देणार येणार आहे. दुधात भेसळ करणाऱ्यांवर तसेच भेसळीचे दूध घेणाऱ्यांवरदेखील फौजदारी कारवाई होणार.
भेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाला ‘आरे’चे २५० कर्मचारी पुरविण्यात येणार आहेत.दूध भेसळ रोखण्यासाठी राज्यभर पथके नेमली जाणार आहेत.
यापुळे एक रुपयात पीकविमाप्रमाणे १ ते ३ रुपयात पशुधन विमा देण्याचा विचार करण्यात येणार आहे. राज्यात शेळी-मेंढीविकासासाठी १० हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे.