Aslam Abdul Shanedivan
दूध आणि गूळ आपल्या आहाराचे भाग असून यातून नैसर्गिक पोषक तत्व मिळतात
दूध आणि गुळामुळे शरीराच्या विविध अवयवांना खूप फायदे मिळतात
दूध संपूर्ण आहार असून प्रथिने, कॅल्शियम, जीवनसत्वे आणि खनिजे असतात. तर गुळातील लोह, फॉस्फरस आणि इतर खनिजांमुळे शरीर निरोगी राहते.
दूध आणि गूळ दोन्ही त्वचेसाठी फायदेशीर असून दुधातील लॅक्टिक ॲसिड त्वचा मुलायम करते. तर गुळामध्ये अँटिऑक्सिडंट वृद्धत्वाची प्रक्रिया मंद करते.
गुळामधील फायबरचे प्रमाण भूक नियंत्रित करून चयापचय वाढवते आणि शरीरातील चरबी कमी करण्यास मदत करते.
दूध आणि गुळामधील कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी हाडे मजबूत करण्यासाठी खूप महत्त्वाचे असतात. जे हाडांचे आरोग्य सुधारतात.
दुधात कॅल्शियम असते, जे हाडे मजबूत करते, तर गुळामध्ये लोह असते, ज्यामुळे शरीरातील अशक्तपणा दूर होतो. या दोन्हींच्या मिश्रणामुळे ऊर्जा आणि ताजेपणा मिळतो. (डिस्क्लेमर : अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)