Anuradha Vipat
स्मार्ट आणि आकर्षक दिसण्यासाठी पुरुषांनी कपड्यांची योग्य निवड, फिटिंग, रंगसंगती आणि अॅक्सेसरीजकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
स्टायलिश दिसण्यासाठी खूप सैल किंवा खूप घट्ट कपडे टाळा. तुमच्या शरीरयष्टीला अनुरूप फिटिंगचे कपडे अधिक आकर्षक दिसतात.
प्रत्येक पुरुषाच्या वॉर्डरोबमध्ये काही आवश्यक कपडे असावेत. पांढरा आणि काळा टी-शर्ट, सॉलिड रंगांचे शर्ट, गडद निळी जीन्स, चिनो पॅन्ट.
एकाच वेळी अनेक भडक रंगांचा वापर टाळा. न्यूट्रल रंगांसोबत एक उठावदार रंग वापरल्यास लुक अधिक आकर्षक दिसतो.
ऑफिस, पार्टी, लग्नसमारंभ किंवा कॅज्युअल आउटिंग यानुसार कपड्यांची निवड करा.
महागडे कपडे घालूनही खराब किंवा अस्वच्छ शूज संपूर्ण लुक खराब करू शकतात.
अतिरिक्त अॅक्सेसरीज वापरण्याऐवजी साधेपणावर भर द्या. घड्याळ, लेदर बेल्ट, सनग्लासेस, वॉलेट.