G-20 Pune : अस्सल मराठमोळे मर्दानी खेळ पाहून भारावले परदेशी पाहुणे

Team Agrowon

G-20 परिषद

'डिजीटल अर्थव्यवस्था' कार्यगटाच्या बैठकीसाठी G-20 चे प्रतिनिधी पुण्यात आले होते.

G-20 Pune | Agrowon

सांस्कृतिक कार्यक्रम

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात या निमित्ताने G-20 प्रतिनिधींसाठीं सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

G-20 Pune | Agrowon

मराठमोळा मर्दानी खेळ

यावेळी मल्लखांब आणि दांडपट्ट्याच्या अस्सल मराठमोळ्या खेळ पाहून परदेशी पाहुणे भारवून गेले.

G-20 Pune | Agrowon

शास्त्रीय नृत्ये

यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमात सादर झालेल्या शास्त्रीय नृत्यांचाही परदेशी पाहुण्यांनी आस्वाद घेतला.

G-20 Pune | Agrowon

मल्लखांब प्रात्यक्षिक

शालेय विद्यार्थ्यांनी पेटत्या मशाली आणि तलवारींसह केलेल्या मल्लखांब प्रात्यक्षिकांनी पाहुण्यांची मने जिंकली. तर मल्लखांबावर साकारलेल्या मानवी मनोऱ्यांनाही त्यांनी भरभरून दाद दिली.

G-20 Pune | Agrowon

दांडपट्ट्यांचे प्रात्यक्षिक

कोल्हापूरच्या शिवशंभू मर्दानी आखाड्याच्या मुलामुलींनी सादर केलेले दांडपट्ट्यांचे प्रात्यक्षिकदेखील तेवढेच चित्तथरारक होते.

G-20 Pune | Agrowon

महिला प्रतिनिधी

यावेळी महिला प्रतिनिधींनी हातात बांगड्या भरल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरून आनंद ओसंडून वाहत होता.

G-20 Pune | Agrowon
G-20 Pune | Agrowon