sandeep Shirguppe
टोमॅटोचे दर वाढल्याने सामान्यांसह 'मॅकडॉनल्ड' सारख्या मोठ्या रेस्टॉरंट्सवरही परिणाम झाला आहे. या संस्थेने अनेक शहरातील आपल्या शाखांतील मेन्यू कार्डमधून टोमॅटो हद्दपार केला आहे.
त्यामुळे खाद्यप्रेमींच्या आवडत्या बर्गरसह अन्य पदार्थांमधून टोमॅटो गायब झाला आहे. मागच्या दोन महिन्यात पुरेसा पाऊस न झाल्याने टोमॅटोचे उत्पादन निम्म्याने खाली आले.
यामुळे टोमॅटोच्या किमतींमध्ये सुमारे पाचपट वाढ झाली आहे. दर वर्षी जून आणि जुलैमध्ये टोमॅटोच्या किमतींमध्ये वाढ होते मात्र यंदा टोमॅटोचे भाव गगनाला भिडले आहेत.
याचा फटका सर्व सामान्यांप्रमाणे खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्या उद्योगांनाही बसला आहे. टोमॅटोच्या वाढलेल्या किमतीमुळे देशातील खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्या मॅकडॉनल्डच्या बर्गर आणि अन्य लोकप्रिय पदार्थातून टोमॅटो गायब झाला आहे.
समाजमाध्यमांवर एका वापरकर्त्याने मॅकडॉनल्डच्या एका हॉटेलबाहेर लावलेली नोटीस शेअर केली आहे. यामध्ये, सध्या आमच्या खाद्यपदार्थामध्ये टॉमॅटोचा समावेश नसेल असे सांगण्यात आले आहे.
सध्या उत्तम प्रतीचे टोमॅटो उपलब्ध होत नसल्याने आम्हाला आमच्या ग्राहकांच्या आवडत्या खाद्यपदार्थामध्ये टोमॅटोचा समावेश करता येत नसल्याचे सांगण्यात आले आहे.
मॅकडॉनल्डच्या ३५७ शाखा असणाऱ्या वेस्टलाइफ फूडवर्ल्डच्या अधिकाऱ्यांच्या मते ही टंचाई तात्पुरत्या स्वरूपाची आहे आणि साधारण जून जुलैमध्ये नेहमीच टोमॅटोची टंचाई जाणवते असे त्यांचे म्हणणे आहे.
'मॅकडॉनल्ड' च्या खाद्यपदार्थातून टोमॅटो गायब झाल्यानंतर समाज माध्यमावर भन्नाट प्रतिक्रिया उमटत आहेत.
एका वापरकर्त्यांने टोमॅटोचा समावेश नसल्याबाबतची पोस्ट केल्यानंतर त्यावर भरपूर प्रतिक्रिया आल्या आहेत. तर दुसऱ्याने 'याला म्हणतात टोमॅटोचे वर्चस्व, एवढा भाव तर कांद्याने देखील खाल्ला नव्हता.'