Anuradha Vipat
त्वचेला उजळवण्यासाठी मुली आपल्या चेहऱ्यावर वेगवेगळे प्रयोग करत असतात. त्वचेला नैसर्गिक चमक आणण्यासाठी महागड्या स्किन केअरचा ही वापर करतात
पण तुम्हाला कदाचित हे माहित नसेल आपल्या स्वयंपाक घरातचं दडला आहे निखळ सौंदर्य राज. मसूर डाळीचा फेसपॅक त्वचेला नैसर्गिक चमक आणण्यासाठी उपयुक्त आहे.
मसूर डाळीतील व्हिटॅमिन बी त्वचेला ओलावा देते आणि निरोगी ठेवते
मसूर डाळ त्वचेला एक्सफोलिएट करते ज्यामुळे मृत त्वचेच्या पेशी निघून जातात
रात्रभर भिजवलेली मसूर डाळ, पाणी किंवा गुलाबपाणी
मसूर डाळ बारीक वाटून घ्या. त्यात पाणी किंवा गुलाबपाणी घाला.
स्वच्छ चेहऱ्यावर फेस पॅक लावा. १५-२० मिनिटे सुकू द्या. नंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा.