sandeep Shirguppe
डाळींमध्ये पोषकतत्वांचे भरपूर प्रमाण आढळून येते. त्यामुळे, डाळी आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात.
यातील मसूर डाळ केवळ आरोग्यासाठी फायदेशीर नाही तर आपल्या त्वचेसाठी देखील तितकीच फायदेशीर आहे.
मसूर डाळीचा त्वचेवर वापर केल्याने त्वचा उत्तम प्रकारे एक्सफोलिएट होण्यास मदत होते.
मसूर डाळ आणि मुलतानी मातीचा फेसपॅक बनवण्यासाठी सर्वात आधी २-३ चमचे मसूर डाळ रात्रभर पाण्यात भिजत ठेवा.
सकाळी ही डाळ बारीक करून त्याची पेस्ट बनवा. त्यानंतर, या पेस्टमध्ये २ चमचे मुलतानी माती आणि १ चमचा मध मिसळा.
तुमचा फेसपॅक तयार आहे. आता हा फेसपॅक चेहऱ्यावल १५-२० मिनिटांसाठी लावा. त्यानतंर, चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा.
जर तुम्ही कोरड्या त्वचेमुळे त्रस्त असाल तर हा मसूर डाळ आणि दुधाचा फेसपॅक तुमच्या त्वचेसाठी फायदेशीर ठरू शकतो.
सदर माहिती सामान्य असून सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही.