Anuradha Vipat
ग्रह आणि नक्षत्रांच्या स्थितीनुसार मार्गशीर्ष महिन्यात केलेले धार्मिक कार्य निश्चितच फलदायी ठरते.
भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांनी स्वतः म्हटले आहे की, "महिन्यांमध्ये मी मार्गशीर्ष आहे"
मार्गशीर्ष महिन्यात केलेली कोणतीही भक्ती किंवा धार्मिक कार्य थेट परमेश्वरापर्यंत पोहोचते अशी श्रद्धा आहे.
मार्गशीर्ष पौर्णिमेला चंद्र 'मृगशीर्ष' किंवा 'मार्गशीर्ष' नक्षत्रात असतो. हा महिना आणि नक्षत्र दोन्ही शुभ मानले जातात.
मार्गशीर्ष महिन्याच्या मध्यात सूर्याचा धनु राशीत प्रवेश होतो, ज्याला 'धनुर्मास' म्हणतात.
धनुर्मास या काळात धार्मिक कार्यांना विशेषतः दत्त उपासना आणि विष्णू पूजेला अधिक महत्त्व असते.
ग्रह-नक्षत्रांची स्थिती आणि धार्मिक महत्त्व यामुळे मार्गशीर्ष महिना हा आध्यात्मिक आणि धार्मिक कार्य करण्यासाठी उत्तम मानला जातो.