Ravikant Tupkar : सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा मोर्चा

Team Agrowon

नैसर्गिक आपत्ती, वाढलेला उत्पादन खर्च आणि पिकाला मिळणारा तुटपुंजा भाव यामुळे शेतकरी प्रचंड हतबल झाले असून बळीराजाच्या मनात असलेला तीव्र रोष आज मोर्चाच्या निमित्ताने बाहेर पडला.

Soybean Cotton Farmers | Ravikant Tupkar

सोयाबीन - कापूस उत्पादकांचा रेकॉर्डब्रेक असा भव्य दिव्य मोर्चा आज बुलडाण्यात काढला. सोयाबीन-कापसाला योग्य भाव मिळावा,

Soybean Cotton Farmers | Ravikant Tupkar

ओला दुष्काळ जाहीर करून अतिवृष्टीची मदत मिळावी,दिवसा वीज द्यावी यासह ईतर मागण्यांसाठी जिल्हाभरातील हजारो शेतकरी व शेतकरी पुत्र तसेच मायमाऊल्या या मोर्चात एकजुटीने सामील झाल्या.

Soybean Cotton Farmers | Ravikant Tupkar

या मोर्चाची ताकद पाहता आपल्याला न्याय मिळाल्यावाचून राहणार नाही याची खात्री वाटली.

Soybean Cotton Farmers | Ravikant Tupkar

येत्या ८ दिवसांत सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर आंदोलनाचा हा वणवा राज्यभर पसरेल.

Soybean Cotton Farmers | Ravikant Tupkar

एक-एक शेतकरी आपल्या हक्कांसाठी पेटून उठेल. सोयाबीन-कापसाला भाव मिळवूनच राहणार, हा निर्धार आता शेतकर्‍यानी केला आहे.

Soybean Cotton Farmers | Ravikant Tupkar

आता भाव मिळेपर्यंत मागे वळणार नाही! शेतकर्यांचे हे प्रेम, आशिर्वाद मला मोठी ऊर्जा देणारे ठरले. असा विश्वास रविकांत तूपकर यांनी व्यक्त केला.

Soybean Cotton Farmers | Ravikant Tupkar
cta image | Agrowon