Sericulture Farming : रेशीम शेतीतून अनेक फायदे, कमी खर्चात जास्त उत्पादन

sandeep Shirguppe

रेशीम उद्योग

सध्या दुग्ध आणि कुक्कुट पालन व्यवसायासोबत रेशीम शेती उद्योगाचा प्रयोग मोठ्या प्रमाणात केला जात आहे.

Reshim Farming | agrowon

अत्यल्प कामगारांमध्ये शेती नियोजन

रेशीम शेतीला खर्च कमी लागत असल्याने शेतकऱ्यांकडील उपलब्ध साहित्यातून करता येतो. याचबरोबर अत्यल्प कामगारांमध्ये या शेतीचे नियोजन करता येते.

Reshim Farming | agrowon

निश्चित दराची हमी

यामध्ये शेतकऱ्यांना कमीत कमी वेळेत महिन्यात जास्तीत जास्त उत्पन्न मिळवीता येते. याचबरोबर पक्का माल खरेदीची शासनाने निश्चित दराची हमी दिलेली आहे.

Reshim Farming | agrowon

तुती लागवड महत्वाची

तुती लागवड, निचरा होणाऱ्या कोणत्याही जमिनीत करता येते. या पट्टा पध्दतीने लागवड केल्याने तुती लागवडीपासून पाल्याच्या उत्पान्नात वाढ होते.

Reshim Farming | agrowon

शाश्वत तुती लागवड

तुतीची लागवड एकदा केल्यानंतर 15 वर्षे पर्यंत जिवंत राहत असल्याने, दरवर्षी लागवड करावी लागत नाही त्यामुळे लागवडीचा खर्च इतर पिकांप्रमाणे वारंवार येत नाही.

reshim farming | agrowon

शासनाकडून मदत

रेशीम अळयांची अंडीपुंज सवलतीच्या दराने 450 टक्के अनुदान दरात शासना मार्फत पुरवली जातात. रेशीम अळयांचे एकूण 28 दिवसांचे आयुष्यमान असते.

reshim farming | agrowon

कोश खरेदी केंद्रांची स्थापना

शेतकऱ्यांच्या कोश खरेदीची हमी शासनाने घेतलेली असून त्यांच्या सोयीसाठी आवश्यक त्या ठिकणी कोश खरेदी केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत.

reshim farming | agrowon

रेशीम आळ्यांमधून अनेक फायदे

रेशीम अळयांची विष्ठा दुभत्या जनावरांना सुग्रास प्रमाणे खाद्य म्हणून वापरता येते. यातून 1 ते दीड लिटर दूध वाढते. वाळलेला पाला व विष्ठेचा गोबरगॅस मध्ये उपयोग करुन उत्तम प्रकारे गॅस मिळतो.

reshim farming | agrowon

देशाच्या विकासात हातभार

तुतीच्या वाळलेल्या काड्याचा इंधन म्हणून वापरता येतात. तसेच खत म्हणून सुध्दा वापरता येते. रेशीम उद्योगापासून देशाला परकीय चलन मिळते व देशाच्या विकासात हातभार लागतो.

reshim farming | agrowon

वाईनसाठीही उपयोग

विदेशात तुतीच्या पानांचा चहा मलबेरी टी करतात. शिवाय वाईन करतात. कोश मेलेल्या प्युपाचा आयुर्वेदीक औषधे व सौंदर्य प्रसाधनात उपयोग करता येतो.

reshim farming | agrowon
sharad pawar | agrowon
आणखी पाहा...