अमित गद्रे
काला पहाड, सफेद मालुदा, करेल, दगड्या, श्रावण्या, चपट्या,अखजा... ही नावे आहेत आपल्या शेतकऱ्यांच्या बांधावरील रायवळ अर्थात गावरान आंब्याची.
चव, रंग, आकार, गुणवैशिष्ट आणि बोलीभाषेनुसार या रायवळ जाती ओळखल्या जातात. काळाच्या ओघात या जातींकडे दुर्लक्ष झाल्याने ही जैवविविधता संपत चालली आहे.
परंतु हवामान बदलाच्या काळात आणि नवी जातींच्या संशोधनाच्यादृष्टीने रायवळ जाती महत्त्वाच्या आहेत.
राज्यातील राहुरी,परभणी, दापोली,अकोला येथील कृषी विद्यापीठांच्या फळ संशोधन प्रक्षेत्रावर आंबा जातींचा विशेष संग्रह करण्यात आला आहे.
यामध्ये राज्य, परराज्य तसेच परदेशातील महत्त्वाच्या व्यावसायिक जाती तसेच स्थानिक रायवळ जातींची लागवड करण्यात आली आहे.
आजच्या ऍग्रोवन(२३ एप्रिल) मधील रायवळ आंब्याची विविधता आणि संवर्धनासाठी सुरू असलेले प्रयत्नांची माहिती देणारा लेख जरूर वाचा...