Team Agrowon
आंबा फळे टिकवण्यासाठी, वाढविण्यासाठी व दर्जा सुधारण्यासाठी उपाययोजना करणं आवश्यक आहे.
आंबा बागेत कीटकांना आकर्षित करण्यासाठी सुका मासा पाण्यात भिजवून लटकवावा. यासाठी निकृष्ट दर्जाच्या बांगडा माशाची निवड करावी.
आंबा मोहोराच्या दांडीवर फळे पिवळी होऊन पडताना किंवा देठाजवळ पिवळी रिंग तयार होताना दिसते.
आंबा मोहरातील परागीभवन वाढविण्यासाठी मोहरावरून हात फिरविणे, उंच फांदीवरील मोहोरासाठी बांबूच्या काठीला केरसुणी बांधून फिरवावी.
डागविरहित फळे मिळण्यासाठी २० × २५ सेंटिमीटर आकाराच्या वर्तमानपत्राच्या पिशव्या तयार करून गोटीच्या आकाराची फळे गळून गेल्यानंतर उरलेल्या फळांना त्यांचे वेष्टण घालावे.
फळधारणेनंतर एकाच दांडीवर भरपूर फळे धरली असल्यास उत्तम वाढ होणारी एक ते दोन फळे ठेवून उरलेली फळे काढून टाकावी.