Roshan Talape
आंब्याच्या पानांमध्ये अनेक औषधी गुणधर्म आणि पौष्टिक घटक असतात. ज्यामुळे शरीराचे आरोग्य चांगले राखण्यासाठी मदत होते.
शरीरातील कोणत्याही प्रकारची सूज कमी करण्यासाठी आंब्याच्या पानांचा वापर केला जातो.
आंब्याच्या पानांमधील घटक रक्तातील साखर नियंत्रित करण्यात मदत करतात. त्यामुळे ही पाने उपयोग मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरतात.
आंब्याच्या पानांतील अँटीऑक्सीडंट त्वचेला तजेलदार ठेवतात आणि वयाच्या खुणा कमी करण्यास मदत करतात.
या पानांचा काढा पोटाच्या तक्रारींवर प्रभावी ठरतो. त्यामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत करते.
आंब्याच्या पानांचा काढा रक्त शुद्ध करण्यासाठी प्रभावी ठरतो. त्यामुळे त्वचेच्या विकारांवर त्याचा फायदा होतो.
आंब्याच्या पानांचा रस हा हृदयासाठी लाभदायक असतो. तो रक्तदाब कमी करण्यात मदत करतो.
आंब्याची पाने खोकला, अस्थमा आणि इतर श्वसनाच्या समस्यांवर उपयुक्त असतात.