Swapnil Shinde
उत्तर प्रदेशतील इरफान अहमद यांनी जमिनीच्या खाली चक्क दोन मजली घर बांधले.
हरदोई भागामध्ये बांधलेल्या या घरात तब्बल १० खोल्या बांधल्या आहेत.
यामध्ये एक बैठकीची खोली तसेच एक छोटी बाल्कनीही बांधण्यात आली आहे.
त्याचबरोबर घरामध्ये चक्क विहीरही खोदली आहे. ते पाणी पिण्यासाठी वापरलं जात होते.
इरफानने तब्बल १२ वर्षे जमीन खोदून आपले घर तयार केले आहे.
सध्या या घर आणि बांधकामाची सोशल मिडियावर जोरदार चर्चा आहे.
परिसरातील गावांमधले लोकही त्यांच हे घर पाहायला येत आहेत.