Anuradha Vipat
मेकअप करताना अनेक मुली नकळत काही सामान्य चुका करतात ज्यामुळे त्यांचा मेकअप नैसर्गिक दिसण्याऐवजी केकी दिसू शकतो.
काही चुका टाळल्यास तुमचा लुक नक्कीच अधिक चांगला दिसेल. आज आपण पाहूयात मेकअप करताना मुलींनी टाळायच्या सामान्य चुका.
तेलकट त्वचेसाठी क्रीम बेस्ड आणि कोरड्या त्वचेसाठी मॅट बेस्ड उत्पादने वापरणे. यामुळे तेलकट त्वचा अधिक तेलकट दिसते किंवा कोरड्या त्वचेवर मेकअप फाटल्यासारखा दिसतो.
फाउंडेशन निवडताना फक्त हाताच्या त्वचेवर शेड तपासणे. हाताचा रंग आणि चेहऱ्याचा रंग यात फरक असू शकतो.
मेकअप करण्यापूर्वी मॉइश्चरायझर किंवा प्रायमर न लावणे. मॉइश्चरायझर वगळल्यास त्वचा कोरडी दिसते. प्रायमर वगळल्यास मेकअप जास्त काळ टिकत नाही
जास्त प्रमाणात ब्लश लावणे किंवा खूप गडद कॉन्टूरिंग करणे.
पेन्सिलचा वापरून भुवया खूप गडद किंवा टोकदार करणे. भुवया चेहऱ्यावर उठून दिसतात.