Anuradha Vipat
मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर काही विशिष्ट वस्तूंची खरेदी करणे भारतीय संस्कृतीत अत्यंत शुभ मानले जाते.
संक्रांतीच्या दिवशी खालील वस्तूंची खरेदी केल्यास सुख, समृद्धी आणि प्रगती लाभते अशी मान्यता आहे.
संक्रांती दिवशी सोन्याचे किंवा चांदीचे नाणे किंवा लहान दागिना खरेदी केल्याने घरात लक्ष्मीचा वास राहतो.
संक्रांतीला नवीन कपडे परिधान करण्याची प्रथा आहे. काळ्या रंगाचे कपडे खरेदी करणे या दिवशी शुभ मानले जाते.
पूजेसाठी लागणारी लहान मातीची सुगडं खरेदी करणे अनिवार्य असते.
या दिवशी नवीन तीळ आणि गूळ खरेदी करणे आरोग्यासाठी आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहे.