Maize Rate : मक्याचा बाजार दबावात

Anil Jadhao 

मका बाजाराचा विचार करता, आंतरराष्ट्रीय आणि देशातील बाजारातही दर नरमले होते.

आंतरराष्ट्रीय बाजारात चालू आठवड्यात मक्याचा बाजार प्रतिटन ६५८ डाॅलरवर उघडला होता. 

आंतरराष्ट्रीय बाजारात शुक्रवारी मक्याचा बाजार ६५० डाॅलरवर बंद झाला. म्हणजेच मका टनामागे ८ डाॅलरने नरमला.

देशात सोमवारी मक्याला सरासरी प्रतिक्विंटल २ हजार २५० रुपये दर मिळाला.

मात्र पोल्ट्री आणि स्टार्च उद्योगांनी मका निर्यातबंदीची मागणी केली. सरकारनं निर्यातबंदी केली नाही. मात्र त्याचा मानसिक दबाव बाजारावर आला होता. त्यामुळं दर काहीसे नरमले.

शुक्रवारी मक्याचा बाजार सरासरी २ हजार १०० रुपयांवर बंद झाला. म्हणजेच मक्याच्या सरासरी दरात क्विंटलमागं १५० रुपयांची घट झाली.

cta image