Swapnil Shinde
इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या फायनलमध्ये महेंद्रसिंग धोनीची चेन्नई सुपर किंग्ज (CSK) पोहोचली आहे.
एमएस धोनीची ही शेवटची आयपीएल आहे त्यानंतर तो क्रिकेटमधून निवृत्ती घेणार असल्याचे बोलले जातेय.
पण धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर लगेच कृषी क्षेत्रात नवी इनिंग सुरू केली आहे.
भारतीय क्रिकेट संघाच्या कर्णधार पदावरून पायउतार झाल्यानंतर झारखंडची राजधानी रांची येथील साम्बो येथे धोनीने शेती करण्यास सुरुवात केली.
43 एकर शेतीमध्ये धोनी भाजीपाला उत्पादन तसेच दुग्ध व्यावसाय, कुक्कुटपालन आणि मत्स्यपालन करतो.
धोनी या शेतात सेंद्रीय भाजीपाल्याची लागवड करतो. फुलकोबी, बटाटे, मटार, ब्रोकोली, काकडी, गाजर, ऑलिव्ह टोमॅटो, मुळा आणि स्ट्रॉबेरीची लागवड केली जाते.
विशेष म्हणजे या शेतीमध्ये धोनी स्वतः सर्व काम करतो. तसेच अनेकदा ट्रॅक्टर चालवताना दिसला आहे.
धोनीच्या शेतात आधुनिक तंत्रज्ञानाने एकात्मिक शेती तंत्राने शेती केली आहे.
रांचीमध्ये धोनीच्या उत्पादनांचे आउटलेटही उघडले आहे. ज्याला इजा फार्म्स असे नाव देण्यात आले आहे. धोनीच्या उत्पादनांना दुबईपर्यंतच्या बाजारपेठांमध्ये मागणी आहे.