Mumbai Morcha: महाविकास आघाडीचा महाराष्ट्रद्रोही विरोधात हल्लाबोल

Anil Jadhao 

राज्यपाल भगतसिंह कोश्यारींसह अन्य भाजपा नेत्यांकडून छत्रपती शिवाजी महाराजांसह महापुरुषांचा अवमान करण्यात आला. त्याविरोधात आज मुंबईत महाविकास आघाडीने मर्चा काढला.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी मुख्यमंत्री बोम्मईंची विधान, राज्यातील प्रकल्पांची पळवापळव, महागाई आणि बेरोजगारी या विरोधातही मार्चाचं आयोजन करण्यात आलंय.

‘महाराष्ट्रद्रोही विरोधात हल्लाबोल’ या घोषवाक्याखाली महाविकास आघाडी रस्त्यावर उतरले.

यामोर्चात शिवसेना (ठाकरे गट), राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते सहभागी झाले आहेत.

हा मोर्चा भायखळा येथून सुरु झाला. त्यानंतर जिजामाता उद्याने मोहम्मद अली रोड ते ‘टाईम्स ऑफ इंडिया’च्या इमारतीपर्यंत हा मोर्चा असेल.

‘टाईम्स ऑफ इंडिया’च्या इमारतीसमोर सभेच आयोजन करण्यात आलं आहे. या मोर्चात किमान एका लाख कार्यकर्ते सहभागी होण्याची शक्यता आहे.

cta image