sandeep Shirguppe
विविध प्रांतामध्ये वेगवेगळी फळे, पिके यासह अन्य उत्पादनांचा मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. दरम्यान यासाठी भौगोलीक मानांकन किंवा चिन्हांकन दिले जाते.
दरम्यान जी.आय. मानांकनात महाराष्ट्राने देशात पहिला क्रमांक मिळवला आहे. राज्याच्या विविध जिल्ह्यातील वैशिष्ट्यपूर्ण वस्तूंना जी. आय. मानांकनप्राप्त झाले आहे.
महाराष्ट्रात अनेक वस्तूंना मानांकन मिळाले आहे. दरम्यान पुढील काळात अनेक वस्तू मानांकन मिळण्याच्या मार्गावर आहेत. यात विशेषत: फळे, धान्य आदी खाद्यपदार्थांसह काही वस्तूंचा समावेश आहे.
जी. आय. प्रमाणपत्रामुळे विविध भागातील वैशिष्ट्य पूर्ण वस्तू उत्पादकांना चांगला फायदा होत असल्याची माहिती समोर आली आहे. शिवाय ग्राहकांच्या फसवणूकीच्या कमी झाल्या आहेत.
एखाद्या विशिष्ट वस्तूशी निगडीत मानांकन वा चिन्ह ज्याचा संबंध भौगोलिक स्थान किंवा उगमस्थानाशी (उदा. शहर, प्रदेश, देश) असतो त्या मानांकनास भौगोलिक मानांकन असे म्हणतात.
भारत जागतिक व्यापार संघटनेचा एक भाग असल्याने १५ सप्टेंबर २००३ पासून मालाचे भौगोलिक मानांकन (नोंदणी आणि संरक्षण) कायदा, १९९९ लागू करण्यात आला.
भौगोलिक मानांकनप्राप्त वस्तूचे नाव अधिकृत वापरकर्त्यांव्यतिरिक्त इतर कोणीही वापरू शकत नाही. दार्जिलिंगच्या चहाला भारतातले पहिले भौगोलिक मानांकन मिळाले होते.
सध्या २५ हून अधिक वस्तूंना जी. आय. मानांकनप्राप्त झाले असून आणखी 13 वस्तूंना मानांकन मिळविण्याच्या अंतिम टप्प्यात आहेत.
स्ट्रॉबेरी (महाबळेश्वर), द्राक्षे (नाशिक), संत्री (नागपूर), आजरा घनसाळ तांदूळ (कोल्हापूर), वायगाव हळद (वर्धा), ज्वारी (मंगळवेढा), वाघ्या घेवडा ( कोरेगाव-खटाव सातारा).
तुरडाळ (नवापूर नंदूरबार), आंबेमोहोर तांदूळ (पुणे), काजू (वेंगुर्ला सिंधुदुर्ग), बेदाणा (सांगली), कांदा (लालसगाव ), घोलवड चिक्कू (डहाणू ठाणे).
सीताफळ (बालाघाट बीड), मोसंबी (जालना), केळी (जळगांव), मराठवाडा केशर आंबा (छ. संभाजीनगर), पुरंदर अंजीर (पुणे), भरीताची वांगी (जळगाव).
डाळिंब (सोलापूर), हापूस आंबा (रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे, पालघर), कोकम (रत्नागिरी-सिंधुदुर्ग), गूळ (कोल्हापूर), मिरची (भिवापूर-नागपूर).