Team Agrowon
नाशिक जिल्ह्यातील नामपूर (ता. सटाणा) येथील बैलबाजाराला ७५ वर्षांची मोठी परंपरा आहे. नाशिक जिल्ह्यासह खानदेश व गुजरातहून शेतकरी व हौशी लोक येथे खरेदीसाठी येतात. शेतकऱ्यांना जातिवंत व खात्रीशीर बैलजोड्या उपलब्ध करणारा असा नावलौकिक नामपूरच्या बाजाराने राज्यात मिळविला आहे.
सौदा होताना शेतकरी इसारा रक्कम देऊन बैलजोडी घेऊन जातात. बैलात खोड निघाली किंवा मारका निघाल्यास ती जोडी व्यापारी परतीच्या बोलीवर परत घेतात. बैलजोडी चांगली निघाल्यास उर्वरित रक्कम शेतकरी व्यापाऱ्यास देतात. असा हा दोघांच्या परस्पर विश्वासावर बाजार सुरू आहे.
बाजार समितीच्या इतिहासात प्रथमच गाळणे (ता. मालेगाव) येथील चंद्रकांत सोनवणे या व्यापाऱ्याकडून पाडगण (ता. कळवण) येथील विष्णू बागूल या युवा शेतकऱ्याने पांढरीशुभ्र खिल्लार बैलजोडी साडेतीन लाख रुपयांना खरेदी केली.
सकाळी ९.३० ते दुपारी ३ वाजेपर्यंत बाजार कामकाज चालते. म्हैस, रेडा, शेळी, मेंढी, बोकड, गाय आदींचीही विक्री होते.
व्यापाऱ्यांना बैल बांधण्यासाठी प्रति महिना एक हजार रुपये दराने भाडेतत्त्वावर चार शेड्स. काही गाळे, पाण्याची सुविधा. संरक्षित भिंत.
प्रति बैल पाच रुपये प्रवेश शुल्क. सौदा झाल्यानंतर प्रति २ रुपये विक्री नोंद शुल्क घेतले जाते.
खिलार - काष्टी, पाथर्डी, वाळकी, लोणी (अ.नगर) बेल्हा (पुणे), बीड, कर्नाटकलाल
कंधारी - परभणी, लातूर
माळवी - सेंधवा, खेतिया (मध्य प्रदेश)
गावठी हल्लम - नाशिक, धुळे