टीम ॲग्रोवन
पंढरपूर : कार्तिकी वारीची शासकीय महापुजा आज शुक्रवारी ( ता.4) पहाटे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सौ अमृता फडणवीस यांच्या हस्ते झाली.
यावेळी मानाचे वारकरी म्हणून उत्तमराव साळुंखे व सौ कलावती साळुंखे (रा. शिरोडी खुर्द, ता.फुलंब्री, जि. औरंगाबाद) यांना उपमुख्यमंत्र्यासोबत महापुजेचा मान मिळाला.
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत उपस्थित.
आज प्रबोथिनी एकादशी (कार्तिकी यात्रा) निमित्त श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीच्या वतीने श्री.नामदेव पायरी श्री. विठ्ठल सभामंडप श्री. विठ्ठल व रूक्मिणीमातेच्या गाभाऱ्यात सुंदर व आकर्षक अशी फुलाची आरास करण्यात आली आहे...
आषाढी आणि कार्तिकी अशा दोन्ही महापुजा करण्याचा मान मला मिळाला, मी भाग्यवान, ही पांडुरंगाची कृपा.
पांडुरंग कष्टकर्यांचा- शेतकऱ्यांचा देव आहे. या सर्वांच्या आयुष्यात चांगले दिवस येवोत, त्यांच्यासाठी करण्याची अधिकाधिक काम करण्याची ताकद, बळ आम्हाला मिळो, ही प्रार्थना केली.
पंढरपूरच्या विकास आराखड्यातील कामे सुरु आहेत. शहराला जोडणार्या पालखी मार्गाचे काम झाले आहे. आता पंढरपुरातील कामांवर लक्ष दिले जाईल, यामध्ये कोणालाही विस्थापित न करता हा आराखडा राबवला जाईल...