Anuradha Vipat
यकृत कर्करोगाचा धोका कमी करण्यासाठी, निरोगी जीवनशैलीचा अवलंब करणे, जास्त मद्यपान टाळणे आवश्यक आहे.
काही बुरशीजन्य विषारी घटक, जसे की एफ्लोटॉक्सिन अन्नामध्ये मिसळून ते खाल्ल्यास यकृत कर्करोगाचा धोका वाढू शकतो.
धूम्रपान केल्याने यकृत कर्करोगाचा धोका थोडा वाढू शकतो.
काही रासायनिक घटक, जसे की नायट्रेट्स, हायड्रोकार्बन्स, सॉल्व्हेंट्स आणि कीटकनाशके, यांच्यामुळेही यकृत कर्करोगाचा धोका वाढू शकतो.
काही औषधे, जसे की ॲनाबॉलिक स्टिरॉइड्स आणि Contraceptives यांचाही यकृत कर्करोगाशी संबंध असू शकतो
कोणत्याही कारणाने यकृताला सूज येऊन सिरोसिस झाल्यास यकृत कर्करोगाचा धोका वाढतो.
काही अनुवंशिक आजार जसे की हेमोक्रोमॅटोसिस आणि अल्फा-१ अँटीट्रिप्सिनची कमतरता यकृत कर्करोगाचा धोका वाढवू शकतात.