Team Agrowon
पावसाळ्यात अनेक प्रकारचे किडे आणि पतंग घरात शिरतात. काही किडे घरातील ट्यूबलाइट आणि बल्बवर बसतात. त्यामुळे अनेकदा वैताग येतो.
यानंतर अनेक वेळा ते त्यांचे पंख घरीत पडलेले असतात. त्याची घाण सर्वत्र पसरते. ते आजूबाजूला दिसते. अशावेळी दिवे बंद करण्याशिवाय पर्याय उरत नाही. मात्र हे काही उपाय तुम्ही वापरु शकता.
कडुनिंब आणि शेणाचा धूर किंड्यांना घालवण्यास मदत करू शकतो. कडुनिंब आणि शेण हे दोन्ही घटक अँटीबॅक्टेरियल आहेत.
शेण आणि कडुनिंबाच्या धुराचा वास भरपूर धूर होईल यातील धुराच्या गंधाने हे किडे पळून जातील.
तुम्ही घरी सागवान लाकूड जाळू शकता. त्याचा वास खूप तीव्र असतो. यामुळे घरातील पतंगांपासून तुमची सुटका होण्यास मदत होईल.
चंदन किंवा आंब्याच्या लाकडाची आग लावा आणि त्यात थोडा कापूर टाका. कापूरच्या वासाने कीटक बेशुद्ध होऊ शकतात.त्यामुळे ही पद्धत या कीटकांना मारण्यासाठी उपयुक्त आहे.
एक दिवा घ्या आणि त्यावर लॅव्हेंडर तेलाचे काही थेंब टाका आणि नंतर ते जाळू द्या. लव्हेडरच्या वासामुळे हे कीटक दूर करण्यासाठी लॅव्हेडर वेगाने कार्य करते.